हा किस्सा किसचा असला तरी जरा गंभीर आहे, कारण किस घेताना प्रियकरांना आता थोडा विचार करावा लागणार आहे.  एका संशोधनानुसार, एका किस १० सेकंदात साधारणपणे ८ कोटी बॅक्टेरिया आपल्या साथीदाराला देत असतो.
 
खरं तर प्रेमी युगलांकडून एकमेकांमध्ये समान गुणधर्माचे बॅक्टेरिया हस्तांतरीत केले जात असल्याचंही संशोधनात सांगण्यात आलंय.
 
कोर्ट नावाच्या  शास्त्रज्ञाने जगातील पहिल्या सूक्ष्मजंतूंच्या म्युझिममधील संशोधकांसोबत केलेल्या अभ्यासात २१ जोडप्यांकडून त्यांच्या किसिंग वर्तनाबद्दल प्रश्नावली भरून घेतली.
 
एक प्रयोग यासाठी करण्यात आला की,  किती प्रमाणात विषाणूंची देवाणघेवाण होते हे पाहणं होतं.या अभ्यासासाठी एक नियंत्रित प्रयोग हाती घेण्यात आला. त्यात प्रत्येक जोडप्यातील सदस्याला विशिष्ट प्रकारचे विषाणू असलेले प्रो-बायोटिक पेय पिण्यास देण्यातआलं. व्यक्तीगत निगा राखण्याच्या सवयी, आहार आणि जीवनशैली यावरही ओरल बॅक्टेरियाचे हस्तांतरण अवलंबून असल्याचं या अभ्यासात सांगण्यात आलंय.  मानवाच्या शरिरात 100 ट्रिलियन सुक्ष्मजीवांचे वास्तव्य असतं आणि ते पचनक्रिया, षोषण, रोग प्रतिकारशक्ती यासाठी आवश्यक ठरत असल्याचा निष्कर्षही यातून निघाला आहे.
 
दहा सेकंदाच्या किसनंतर 8 कोटी बॅक्टेरियांची देवाण घेवाण झाल्याचं दिसून आलं. चुंबनानंतर प्रो-बायोटिक बॅक्टेरियाच्या प्रमाणात तीनपट वाढ झाल्याचं आढळून आले. मायक्रोबायोम या मासिकामध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलंय.

Leave A Comment

you might also like