तुमचे मसल्स अधिक मजबुत करायचे असतील तर लाल टॉमेटोपेक्षा हिरवे टॉमेटो खाणे अधिक चांगले. कच्च्या टॉमेटोमध्ये अनेक गुण आहेत. आरोग्य चांगले होते शिवाय आपले मसल्स अधिक स्ट्रॉग होतात.
एका नविन संशोधनामध्ये हिरव्या टॉमेटोतील प्राकृतिक पदार्थामुळे मांसपेशीमध्ये चांगली वृद्धी होते. याशिवसाय मांसपेशी अधिक मजबुत होते. तसेच मांसपेशी नष्ट होण्याचा धोका टळतो. आयोवा विद्यापाठीच्या संशोधकांनी हे अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे. हिरव्या टॉमेटोमध्ये `टोमॅटिजाईन` हा पदार्थ मांसपेशी तयार करण्यास मदत करतात तर या मांसपेशी वाचवू शकतो. तर अधिक मजबूत करतो. आपल्या वाढत्या वयाबरोबर मांसपेशी कमी होण्याचा जास्त धोका असतो. हा धोका कच्चा टॉमेटोमुळे टळतो.
कॅन्सर आणि हड्डी जखम आदीमुळे मांसपेशी कमी होतात. अशा स्थितीत तुम्ही हिरवे टॉमेटो सेवन केलेत तर ते तुमच्यासाठी चांगलेआहे. तुमची वाढणारी समस्या कमी होते. त्यामुळे आहारात तुम्ही हिरव्या टॉमेटोचे अधिक सेवन करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

Leave A Comment

you might also like