व्यायामासोबत कधी कधी उपवास करणं मेंदूतील न्यूरॉनच्या वाढीसाठी उत्तम असतं. एका शोधामध्ये ही बाब पुढे आलीय. 

प्राण्यांवर केलेल्या एका शोधात ही माहिती पुढं आलीय की, थांबून थांबून उपवास ठेवल्यानं बुद्धीत वाढ होतेय. सोबतच मेंदूच्या कार्यात कमतरता होण्याची भीतीही कमी होते. अमेरिकेच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एजिंगमध्ये मज्जासंस्था वैज्ञानिक मार्क मॅटसननं सांगितलं की, आमच्या जवळ याचे साक्षीदार आहेत. व्यायाम आणि मध्येमध्ये उपवास केल्यानं न्यूरॉन्समध्ये सूत्रकणिकांच्या संख्येत वाढ होते. 

मध्ये-मध्ये उपवास केल्यानं मानसिक कामगिरीच्या कसोटीत सुधारणा होते. तंत्रिका मज्जासंस्थेच्या संयोजनेत बदल होऊ शकतो. उपवास आणि व्यायामनं तयार होणारा तणाव मेंदूला अनुकूल ठेवण्यात आणि न्यूरॉन्सची ऊर्जा प्रवाहात ठेवण्यात मदत करतं. हे अध्ययन नुकतंच सोसायटी फॉर न्यूरो सायंसच्या वार्षिक बैठकीत प्रस्तुत केलं गेलंय.  

Leave A Comment

you might also like