लठ्ठपणा हा जीवनशैलीशी निगडीत आजारांपैकी एक आजार म्हणूनच ओळखला जातो. लठ्ठपणामुळे वीसहून अधिक आजारांना आमंत्रण मिळते, असे या क्षेत्रातील डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवा.

लठ्ठपणाशी निगडीत आजारांमध्ये निद्रानाश, हार्निया, वेरीकोज वेन्स, सांध्याचे विकार, मूत्राशयाचे आजार, श्वास अडकून अचानक मृत्यू, यासह श्वसनाच्या अनेक आजारांचा समावेश आहे. त्यामुळे शरीराच्या वजनात २० टक्के घट झाल्यास या आजारांचा धोका ४० टक्क्यांनी कमी होतो.

हे करा…

– चरबीयुक्त पदार्थ व साखर टाळा.

– मद्यमान कमी करा.

– ताण, राग व कंटाळा या भावनांना लांब ठेवा

– बैठी जीवनशैली टाळा

– आठवड्यातून किमान तीन दिवस अर्धा तास व्यायाम करा

– लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा

Leave A Comment

you might also like