* वजन कमी करा  (आहारावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम)
* आहार समतोल असावा
* आहारात चोथा योग्य प्रमाणात आहे याची खातरजमा करा.
* रोजच्या जेवणात भरपूर भाज्या, हिरव्या  पालेभाज्या, सॅलड, (काकडी, गाजर, टोमॅटो, कोबी इत्यादी) कडधान्य, जवस, काऱ्हाळयाची चटणी आणि फळांचा समावेश असावा.
* साखर, गूळ, मदा, मक्याचे पांढरे पीठ, पॉलिश केलेले तांदूळ व त्याचे पीठ या गोष्टींचा वापर अत्यल्प असावा (खरे तर आपल्या रोजच्या आहारात या पदार्थाचा सहभाग अजिबात नसावा, परंतु आपण सवयीचे गुलाम आणि गुलामाचे स्वातंत्र्य मर्यादितच असते म्हणून अत्यल्प).
* जेवणाच्या वेळेच्या बाबतीत शिस्त पाळा. रोज न्याहारी अत्यावश्यक आहे. मधल्या वेळेत अरबटचरबट खाणे कटाक्षाने टाळा.
* व्यायाम हा दिनचर्येचा अविभाज्य भाग करा. चालणे हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. यांत्रिक युगात शारीरिक व्यायामाची जागा यंत्रांनी घेतली. त्यामुळे शारीरिक निष्क्रियता निर्माण झाली आहे. त्यामुळे दररोज व्यायाम करणे, मदानी खेळ खेळणे याकडे लक्ष दिले पाहिजे.
* जमेल तेवढे पायी चालावे. एक दोन बसथांब्यांएवढे अंतर असेल तर पायी जावे. अशा प्रकारच्या सवयी हट्टाने लावून घ्यावात.
* संस्कारक्षम वयात आहार आणि व्यायाम या गोष्टींचे संस्कार व्हायलाच हवे.
* ताणतणावावर नियंत्रण ठेवा (कठीण असले तरी अशक्य नाही).
* निवांत झोप सर्वागीण आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Leave A Comment

you might also like