कोवळ्या सूर्य किरणांने `ड` जीवनसत्व मिळतं हे तुम्हांला माहीत असेल. मात्र एवढचं नाही तर सकाळी कोवळी किरणं वजनावरही नियंत्रण ठेवतात. अभ्यासकांच्या मते, तुम्ही जर दिवसानंतर ऊन घेत असाल, तर ते तुमच्या शरीरातील द्रव्यमान कमी करतं.
कडक ऊन, त्याची तीव्रता आणि ऊन घेण्याची चुकीची वेळ याचा थेट संबंध तुमच्या वजनावर होतो. `सकाळचं कोवळ ऊन हे वजन कमी करतं` असे, फेयनबर्ग स्कूल ऑफ मेडिसनचे संशोधक प्राध्यापक कॅथरिन रीड यांनी सांगितलंय.
संशोधकांच्या मते, कडक ऊन हे सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारपर्यंत असतं. यावेळेत उन्हांत राहिल्याने शरीरातील द्रव्यमान कमी होत. त्यामुळे द्रव्यमान नियंणत्रित ठेवण्यासाठी 25 ते 30 मिनिटं सकाळचं कोवळे ऊन घेणे आवश्यक आहे.

Leave A Comment

you might also like