हल्ली कमी वयातच अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो.  आपले हृदय स्वस्थ आणि निरोगी ठेवणे आपल्या हातात आहे. हृदयाशी निगडीत समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच आटोक्यात आणणे आपल्याला शक्य आहे.

 

योग्य पोषक त्याचबरोबर काही घरगुती उपाय केल्यास आपण हृदयाच्या  निगडीत समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.
 

नियमित व्यायाम :
नियमित व्यायाम आपल्या हृदयासाठी चांगला आहे. दररोज कमीत कमी एक तास व्यायाम करावा. यासाठी आपल्याला जीममध्ये जाण्याचीही गरज नाही. सकाळच्या वेळेस चालणे, योगासने करणे, तसेच मेडीटेशन करणे आणि सायंकाळच्या वेळेस हलका व्यायाम करणे, पुरेसे आहे.

 

हेल्दी फूड 
आहारात कडधान्य, फळे, आणि सर्व फळ तसेच हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा. हृदयासाठी हेल्दी फूड खाणे गरजेचे आहे

 

स्मोकिंगला करा बाय – बाय 
स्मोकिंग करणे हृदयासाठी खूप हानीकारक आहे. हृदयाशी निगडीत समस्या असलेल्यांसाठी स्मोकींग करने चारपट धोकादायक आहे. सिगारेट पिण्याची इच्छा झाल्यास त्याऐवजी ज्युस अथवा पाणी प्यावे.

 

चिंतेपासून दूर रहा 
सतत चिंतेत आणि तणावात राहणे  चांगले नाही. तणाव दूर करण्यासाठी अनेकजण दारु अथवा सिगारेटचा आधार घेतात. मात्र, हृदयासाठी धोकादायक असलेल्या या गोष्टींऐवजी मेडीटेशन तसेच योगासन करावे.

 

वजनावर ठेवा कंट्रोल
लठ्ठपणा आणि वाढते वजन ही दोन हृदयाशी निगडीत आजारामागची प्रमुख कारणे आहेत. अति वजन आपल्या शरीरावर दबाव टाकते. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. यामुळे वजन वाढू देवू नये.

Leave A Comment

you might also like