जर तुमचं वजन सारखं वाढत असेल आणि त्यामुळं तुमच्या कबंरेची साइज ही 32 हून 36 झाली असेल तर आताच सावधान व्हा… कंबरेचं आणि पोटाचं वाढणं हे तुमच्या आजाराला आमंत्रण आहे, त्यामुळं खूप समस्या उद्भवू शकतात.
तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्या आहे तर असे काही छोटे-छोटे आयुर्वेदिक उपाय केल्यानं वजन नियंत्रित करता येतं.
वाचा या टिप्स
- भाजी आणि फळांमध्ये कॅलरी कमी असतात त्यामुळं ते जास्त प्रमाणात खावे. केळ आणि चिकू खाऊ नये त्यानं लठ्ठपणा वाढतो.
- जेवताना टॉमेटो आणि कांदाच्या कोशिंबीरमध्ये मिरे आणि मीठ घालून खावे. त्यानं शरीराला विटामिन सी, ए, के, लोह, पोटॅशिअम, लायकोपिन आणि ल्यूटिन मिळतं.
- ताज्या पुदिन्याच्या पानांची चटणी करुन चपातीसोबत खावी. पुदिन्याचा चहा पिल्यास वजन नियंत्रित राहतं.
- जेवणापूर्वी गाजर खावे. जेवणापूर्वी गाजर खाल्यास भूक कमी होते.
- एका कपात उकळत्या पाण्यात अर्धा चमचा बडिशोप टाका. 10 मिनिटं त्याला झाकून ठेवा. ठंड झाल्यानंतर ते पाणी प्यावं. तीन महिने केल्यास वजन कमी होते.
- हिरडा आणि बेहडाचं चूर्ण बनवा. एक चमचा चूर्ण 50 ग्राम परवलच्या रसासोबत नेहमी घ्या, वजन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल.
- कारल्याची भाजी खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते. शेवग्याचा नियमित वापर केल्यास वजन नियंत्रित राहतं.
- सुंठ, दालचिनीच्या साली आणि काळी मिरे (3-3 ग्राम) बारीक करुन चूर्ण बनवावं. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण खावं.
- पपई नियमितपणे खावी. पपई सगळ्या सीजनमध्ये मिळते. खूप दिवस पपई खाल्ल्यास कंबरेची चरबी कमी होते.
- जेवणामध्ये दहीच खाल्ल्यास चरबी कमी होते. ताक ही दिवसांतून दोन-तीन वेळा प्यावं.
- आवळा आणि हळद समप्रमाणात घेउन बारीक चूर्ण करावं. हे चूर्ण ताकासोबत घेतल्यास कंबर एकदम सुबक होते.
- लेंडी पिंपळी बारीक करुन कपड्यावर साफ करावी. हे चूर्ण तीन ग्राम नेहमी ताकासोबत घ्यावी त्यानं बाहेर आलेलं पोट कमी होतं.
- मुळांचा रस आणि मध सम प्रमाणात पाण्यासोबत मिसळून प्यावं, असं केल्यानं एक महिन्यात लठ्ठपणा कमी होतो.
- नेहमी सकाळी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्यावं, असं केल्यानं चरबी कमी होते.
- कोबीचा ज्यूस प्यावा, चरबी कमी होते.
- एक चमचा पुदीना रसामध्ये 2 चमचे मध मिसळून प्यायलास लठ्ठपणा कमी होतो.
- सकाळी उठल्यावर 250 ग्राम टोमॅटोचा रस 2-3 महिना प्यावा चरबी कमी होण्यास मदत होते.