1. डास चावल्यानंतर…
मच्छर चावल्यानंतर लोशन किंवा क्रिम लावण्याऐवजी जर केळातील आतला गर लावला तर ती जागा लवकर बरी होते. सूज कमी होते… आणि आराम मिळतो.
2 रक्ताभिसारण प्रक्रिया
केळामध्ये व्हिटॅमिन बी असल्याने त्याचा आपल्या रक्ताभिसारण प्रकियेत खुप उपयोग होतो. तसेच केळातील पोषक तत्वामुळे ताणतणावापासून मुक्ती मिळते.
3 तल्लख बुध्दी
रोज किमान दोन केळी खाल्याने तुमची बुद्धी तेज होण्यास मदत होईल.
4 हॅंगओव्हर
खूप दारू पिल्याने जर तुम्हाला हॅंगओव्हर झाला असेल तर तो उतरण्यासाठी तुम्हाला 'बनाना शेक'चा उपयोग होईल.
5 जळजळ आणि अॅसिडिटी
जर तुम्हाला जळजळ आणि अॅसिडिटीचा त्रास असेल तर रोज केळं खाल्ल्याने तुम्ही या त्रासातून मुक्त होऊ शकता.
6 ब्लडप्रेशर
केळ्यामध्ये पोटॅशिअमची मात्रा जास्त असते तसंच मिठाची मात्रा कमी असल्याने तुमचा ब्लडप्रेशर स्थिर राखण्यास केळ्याची मदत होते.
7 मॉर्निंग सिकनेस
जर तुम्हाला जेवल्या नंतरदेखील खूप भूक लागत असेल तर रोज जेवणानंतर एक केळ खा. तुम्हाला हा त्रास जाणवणार नाही
8 अल्सर
जर तुम्हाला तोंड येणे, अल्सर यांसारखे त्रास सतावत असतील तर केळं तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकते आणि तुम्हाला या त्रासांपासून लवकर आराम मिळेल.