डाळिंबात अनेक आरोग्यकारी गुणधर्म आहेत. स्वस्थ आणि सुंदर त्वचेसाठी डाळिंब खूप उपयुक्त आहे. 

एका वेबसाइटनुसार प्राकृतिक आणि आयुर्वेदिक पद्धतीनं त्वचेची काळजी घेण्यासाठी सौंदर्य प्रसाधनं बनवणाऱ्या कंपनीचे ब्रँड व्यवस्थापक रेन होम्स यांनी सांगितलं की, डाळिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट वाढत्या वयात त्वचा तरूण ठेवतो. शिवाय अनेक बाबींमध्ये डाळिंब उपयुक्त आहे.
 
डाळिंबात शक्तीशाली अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळं त्वचेला पोषण मिळतं. सुरकुत्यांपासून त्यामुळं तुम्ही वाचू शकता आणि आरोग्यालाही त्याचा फायदा होतो. एवढंच नव्हे तर त्याच्या बियांचा वापर चेहऱ्याला स्क्रब करण्यासाठी होऊ शकतो. 

Leave A Comment

you might also like