आपल्या त्वचेला उन्हापासून वाचविण्यासाठी विविध ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. पण दररोज अशा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यातल्या त्यात त्याचा फायदाच होईल, असंही नाही. म्हणूनच गुलाब पाणी अर्थात रोझवॉटरचे काय फायदे आहेत ते पाहा…
– गुलाबपाणी दाहक विरोधी गुणधर्मानं परिपूर्ण आहे. त्यामुळं खाज सुटल्यास आणि भाजलेलं असल्यास गुलाब पाणी लावल्यानं दाह कमी होतो.
– गुलाब पाणी अतिशय चांगलं क्लिनझिंग एजंट म्हणून उपयुक्त आहे. तसंच आपल्या त्वचेवरील घाण, मळ काढून टाकतं.
– चेहऱ्यावरील, त्वचेवरील डाग मिटवण्यास गुलाब पाणी अतिशय लाभदायक आहे. दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी रोझवॉटर आपल्या चेहऱ्याला लावा आणि फरक अनुभवा.
– गुलाब पाणी शॅम्पूनंतर केसांना लावल्यास एक चांगल्या कंडिशनरचा फायदा मिळतो.
– गुलाब पाणी घरगुती ब्युटी पॅक्समध्ये वापरता येतात. त्यामुळं त्वचेला फ्रेश अप करता येतं.