• करवंद – करवंद खाणे हे खूपच फायदेशीर आहे. करवंदांमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
  • पालक – इतर पालेभाज्यांपैकी पालक या पालेभाजीत खूप महत्वाचे गुणधर्म आहेत. पालक ही भाजी तुम्हाला आम्लपित्तांच्या त्रासापासून दूर ठेवते. तसेच कॅँसर आणि ह्दयविकारांच्या आजारापासून दूर ठेवते.
  • ग्रीन टी – ग्रीन टी मुळे तुमच्या हेल्थवर खूप चांगला परिणाम होतो. तसेच तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
  • बदाम – रोज बदाम खाल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये खूप फायबर आणि प्रोटीन आहे ज्याचा तेज बुध्दीत चांगलाच परिणाम होतो.
  • शिमला मिरची – शिमला मिरची ही वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असते. लाल, हिरवा, पिवळा, अशा रंगात असणाऱ्या शिमला मिरचेत व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चे गुणधर्म असतात जे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करते.
  • दही – दह्यामुळे तुमच्या शरिरातील तापमान थंड राहण्यास मदत होते. तसेच दही हे आम्लपित्तांच्या त्रासापासूनदेखील दूर ठेवते.
  • पेर – हे खूप पौष्टीक आणि चविष्ट असे फळ आहे. पेर हा सफरचंदाचाच एक प्रकार आहे. याच्या नियमित खाण्याने पोटदुखी सारखे आजार कमी होतात.
  • अंडी – दिवसातून एक तरी उकडलेले अंड तुमच्या शरिरातील ऊब कायम ठेवण्यास मदत करते.
  • सफरचंद – इंग्रजीतली म्हण आहे… ‘अॅन अॅपल किप्स अ डॉक्टर अवे..  ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. दिवसातून एक तरी सफरचंद खाणे खूप गरजेचं आहे.
  • ज्वारी – हे एक धान्य हाय प्रोटीन धान्य आहे. न्युट्रिशनिस्टच्या मते ह्या धान्याचा उपयोग रोजच्या जेवणात असावा. सध्या ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत.

One Comment

  1. Digambar December 5, 2014 at 5:07 pm - Reply

    Nice…..

Leave A Comment

you might also like