प्रत्येक किशोरवयीन मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पिंपल्स एक किशोरवयीन तरुण-तरुणींमधील कॉमन समस्या आहे. पिंपल्स येण्यामागे भरपूर कारणं आहेत. पण, त्यावर उपाय सुद्धा आहेत.

जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील. तर काकडीच्या गोल चकत्यांनी चेहऱ्याला मसाज केल्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. त्या व्यतिरिक्त दररोज चेहरा गुलाब पाण्याने स्वच्छ केल्यामुळे आराम मिळेल. हळद, मुलतानी माती, गुलाब जल आणि बेसन हे सर्व एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानं पिंपल्स रोखण्यास मदत होते.  

हार्मोन्सचे असंतुलन, मलावरोध, अनियमित मासिक पाळी, जास्त मीठ, आंबट आणि मसालेदार जेवण ही पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आहेत. पिंपल्सला सतत स्पर्श केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची लस पसरते.   

Leave A Comment

you might also like